वंध्यत्व उपचार ... समज-गैरसमज
डॉ. वामन घोडके
वंध्यत्व’ या एका शब्दात खूप अर्थ सामावलेला आहे.हा शब्द जसा साधा, सरळ, सोपा नाही.तसंच त्याच्यावरचे उपचार हे आधुनिक तंत्रज्ञान येण्याआधी सोपे, साधे नव्हते.वंध्यत्वावर मात करणं हे पूर्वी सोपं नव्हतं किंवा थोडंफार अशक्य होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
पण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही अशक्यप्राय गोष्ट शक्यप्राय वाटू लागली आहे.किंबहुना नवीन तंत्रज्ञानामुळे वंध्यत्व असणारी जोडपी आणि उपचार करणारे डॉक्टर्स ह्यांचा आनंददायी, दिलासा देणारा हा प्रवास होत आहे.
आपल्याला माहित आहेच की, साधारणत: वंध्यत्वाची कारणे कोणती कोणती आहेत ?
उदा.गर्भधारणेसंबंधीच्या अवयवांचे आजार
गर्भाशयासंबंधीच्या समस्या
1.Bicornuate Uterus
वंध्यत्व’ या एका शब्दात खूप अर्थ सामावलेला आहे.हा शब्द जसा साधा, सरळ, सोपा नाही.तसंच त्याच्यावरचे उपचार हे आधुनिक तंत्रज्ञान येण्याआधी सोपे, साधे नव्हते.वंध्यत्वावर मात करणं हे पूर्वी सोपं नव्हतं किंवा थोडंफार अशक्य होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
पण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही अशक्यप्राय गोष्ट शक्यप्राय वाटू लागली आहे.किंबहुना नवीन तंत्रज्ञानामुळे वंध्यत्व असणारी जोडपी आणि उपचार करणारे डॉक्टर्स ह्यांचा आनंददायी, दिलासा देणारा हा प्रवास होत आहे.
आपल्याला माहित आहेच की, साधारणत: वंध्यत्वाची कारणे कोणती कोणती आहेत ?
उदा.गर्भधारणेसंबंधीच्या अवयवांचे आजार
ऑपरेशनपूर्वी
2.Septate Uterus
ह्यामध्ये गर्भाशयात पडदा निर्माण झालेमुळे गर्भाशय दुभंगले जाते.हा पडदा दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करुन काढला जातो.ह्याला Septurm Excision म्हटले जाते.आपल्या हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारे पडदा काढल्यानंतर बऱ्याच जणांना त्याचा लाभ झाला आहे.
ऑपरेशनपूर्वी
ऑपरेशनंतर
3.गर्भाशय छोटे असणे
यामध्ये गर्भाशयाची पोकळी ही छोटी असते.ही पोकळी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करुन मोठी करण्यात येते.ह्या ऑपरेशनला ‘Metroplasty’ म्हणतात. घोडके हॉस्पिटलमध्ये Metroplasty शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारेच केली जाते.अशा प्रकारच्या ऑपरेशननंतर पेशंटना गर्भधारणा होण्यास मदत झाली आहे.
ऑपरेशनपूर्वी
ऑपरेशनंतर
4) Asherman (गर्भाशयाचा आंतरभाग चिकटून बसणे) -
गर्भाशयाला जंतूसंसर्ग झालेमुळे गर्भाशयाची पोकळी आतून चिकटली जाते. त्यामुळे अंगावरुन फार कमी जाणे / फक्त डाग पडणे व गर्भधारणा न होणे अशा अनेक अडचणी निर्माण होतात. जर आपण ही पोकळी व्यवस्थित केली तर त्याचे फायदे होतात. घोडके हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे बऱ्याच पेशंटना त्याचा फायदा झालेला आहे.
ऑपरेशनपूर्वी
ऑपरेशनंतर
ह्या झाल्या गर्भाशयासंबंधीच्या समस्या. आता पाहू स्त्रीबीजांडा संबंधीच्या समस्या
PCOS
Adhesions
Endometriosis
गर्भनलिका संबंधीच्या समस्या
Tubal Block
गर्भाशयाला जंतूसंसर्ग झालेमुळे गर्भाशयाची पोकळी आतून चिकटली जाते. त्यामुळे अंगावरुन फार कमी जाणे / फक्त डाग पडणे व गर्भधारणा न होणे अशा अनेक अडचणी निर्माण होतात. जर आपण ही पोकळी व्यवस्थित केली तर त्याचे फायदे होतात. घोडके हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे बऱ्याच पेशंटना त्याचा फायदा झालेला आहे.
आता आपण स्त्रीवंध्यत्वाची कारणे बघितली, त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये शुक्रजंतू कमी असणे हे ही वंध्यत्वाचे कारण असते.वंध्यत्वावर खालील आधुनिक उपचार पध्दतीने मात केली जाते.
IUI (Intra Uterine Insemination)
ICSI (Intra Cytoplasmic Sperm Injection)
IVF (In Vitro Fertilization)
IVF म्हणजेच Test Tube Baby समाजामध्ये ह्या उपचार पध्दतीचा शोध लागून 4 दशकांहून जास्त काळ लोटला तरीही बरेच गैरसमज आहेत.
गर्भधारणा न होण्याची अनेक कारणे असतात. प्रत्येक पेशंटला IVF च्या उपचार पध्दतीची गरज नसते.IVF केली म्हणजे 100% गर्भधारणा होतेच असे नाही.टेस्ट ट्युब बेबी यशस्वी होण्याचा दर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. जसे वंध्यत्वाचे कारण, स्त्रीचे वय, शुक्राणूंची प्रत, भ्रूण तयार करण्यासाठी वापरलेली औषधे, भ्रूण सोडल्यानंतर वापरात येणारी औषधे व जेथे भ्रूण तयार करण्यात येतो त्या लॅबची रचना व क्वॉलिटी (गुणवत्ता) इत्यादी.
याद्वारे जन्माला आलेली मुले ही सर्वसाधारण मुलांसारखीच असतात. अजून एक गैरसमज आहे की, Test Tube Baby केली तर जुळे, तिळे मुलं जन्माला येतात, असे प्रत्येकवेळेसच होते असे नाही. कधी-कधी जुळे-तिळे राहू शकतात किंवा फक्त एकच गर्भ वाढतो.
IVF च्या संदर्भात सगळ्यात मोठा गैरसमज आहे की, बीजांडे किंवा शुक्राणू दुसऱ्याचे वापरले जातात. हा समज चुकीचा आहे. पती व पत्नीचेच शुक्राणू व बीजांडे वापरले जातात. पतीमध्ये शुक्राणू तयार होत नसतील किंवा स्त्रीमध्ये बीजांड तयार होत नसतील तरच बँकेतून वापरण्याची गरज असते आणि ते करताना सुध्दा पती व पत्नी दोघांची संमती लागते.
पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या कमी असते. त्याचप्रमाणे स्त्रीमध्येही अंडाशयाचे काम कमी झालेले असेल तर बीजांड तयार होत नाहीत. अशावेळी बाहेर गर्भ तयार करुन हा गर्भ पत्नीच्या गर्भाशयात वाढवून त्या स्त्रीला आई होण्याचे सुख देता येते. यामध्ये पतीचे शुक्रजंतू वापरले जातात. त्याला Oocyte Donation असे म्हणतात.
कित्येकदा पती व पत्नी या दोघांमध्ये कमतरता असेल, शुक्राणू व बीजांड दोन्ही तयार होत नसतील तर Donor वापरले जातात. यामुळे स्त्री गर्भवती राहू शकते.या प्रकाराला Embryo Donation म्हणतात.
समजा पतीच्या वीर्यामध्ये शुक्राणू नसतील किंवा तयार होत नसतील तर पती-पत्नीच्या लेखी संमतीनंतर बँकेतून शुक्राणू घेतले जातात. त्याला Donor Sperm वापरणे म्हणतात. ह्यात पतीची उंची, वर्ण, डोळ्याचा रंग, रक्तगट यांच्याशी साम्य असलेलेच वापरले जाते.
बऱ्याचदा Test Tube Baby हा पर्याय खूप उशिरा निवडला जातो.त्यामुळे त्याचा यशस्वी होण्याचा दर कमी होतो.
नेहमीच आपल्याला मनामध्ये एक प्रश्न घुटमळत असतो. तो म्हणजे – एवढे सारे केले तर रिझल्ट 100% असणार का ? जेव्हा आपण IVF साठी विचार करतो तेव्हा आपल्याला काही ना काही Problem असल्याशिवाय आपण अशा प्रयत्नांना Process ला जात नाही आणि जेव्हा आपण अडचणीतून मार्ग काढतो तेव्हा सर्वच अडचणी 100% सुटतात असे नाही. आपण नक्की चांगला प्रयत्न करु शकतो. चांगला प्रयत्न म्हणजे काय ? Success कशावर अवलंबून असते ?
चांगल्या प्रकारची औषधे
उदा. Ordinary औषधे® Purified औषधे®Highly Purified औषधे® रिकाँबिनंट औषधे अशाप्रकारे औषधे बदलत जातात व त्याचे रिझल्टही बदलत जातात. अगदी याचप्रकारे उच्च दर्जाची उपकरणे व IVF ची लॅब या गोष्टींची जोड व नवनविन तंत्रज्ञान अवगत असणारी व्यक्ती या सर्व गोष्टी जर एकत्र जुळून आल्या तर नक्कीच त्यातून येणारा success हा अगदी चांगला असतो.
आपल्या हॉस्पिटलमध्ये वध्यंत्ववर उपचार तर केले जातातच, पण जन्मत:च ज्या मुलींना जनेंद्रियांचे व्यंग असेल जसे की, गर्भाशयाचे तोंड नसणे, पाळीची जागा नसणे यांसारख्या व्यंगावरही यशस्वीपणे शस्त्रक्रिया करुन व्यंग दुरुस्त करण्यात आले आहे.
दिलेली उपचार पध्दती बरोबर आहे का ?याचा पेशंटनही विचार करायला हवा आणि त्याबद्दल मनात कोणतीही शंका न ठेवता डॉक्टरांना प्रश्न विचारुन शंका निरसन करायला हवे.तरच उपचार पध्दतीचा पेशंटला फायदा होतो.
Your Parenthood Journey Starts Here
We’re here to guide, support, and care for you every step of the way.
Get in Touch
Phone: +919404290290
📧 Email: giftivfclinic@gmail.com
🕒 Timings: Mon–Sat 9 AM–6 PM | Sun By Appointment | 24×7 Emergency Support
Copyright © 2025 giftivf| Powered by giftivf